नाट्यसंस्कार परीक्षा

नाट्यसंस्कार परीक्षा

महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे  नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे आयोजित  ‘भालबा केळकर करंडक’ आंतरशालेय नाटिका स्पर्धा (प्राथमिक  शाळा)

महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे आयोजित ‘भालबा केळकर करंडक’ आंतरशालेय नाटिका स्पर्धा (प्राथमिक शाळा)

दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०१९ (मराठी)

दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०१९ (मराठी)

पुणे विभाग – २१ व २८ जुलै
पिंपरी चिंचवड विभाग – ४ व ११ ऑगस्ट
महाअंतिम सोहळा – २५ ऑगस्ट

युवा नाट्य प्रशिक्षण शिबीर

युवा नाट्य प्रशिक्षण शिबीर

बालनाट्य प्रशिक्षण शिबीर

बालनाट्य प्रशिक्षण शिबीर

रविवार सत्र ( ७ ते १६ वयोगटासाठी )

रविवार सत्र ( ७ ते १६ वयोगटासाठी )

दर रविवारी

सकाळी १० ते १ आणि

दुपारी २ ते ५

ताजी बातमी

नाटयसंस्कार कला अकदमीच्या वतीने २८ एप्रिल रोजी एक अनोखा कार्यक्रम

नाटयसंस्कार कला अकदमीचे नावाजलेले, गुणवंत, यशवंत विद्यार्थी सुबोध भावे, सक्षम कुलकर्णी, गायत्री दातार, योगेश सोमण, शिवानी रांगोळे, आणि सोनाली कुलकर्णी या कलाकरांच्या पालकांचा सत्कार मा. आमदार मेधा कुलकणी यांच्या हस्ते करण्यात आला. या पालकांशी संस्थेच्याच माजी विद्यार्थींनी आणि “ देणे समाजाचे “  हा सेवाभावी उपक्रम चालवणाऱ्या “ वीणा गोखले “ यांनी संवाद साधला.

१ मे पासुन सुरु होण्याऱ्या नाटय कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हा कार्यक्रम आयोजीत  केला होता. कर्तृत्त्ववान कलावंत घडत असताना त्यांचा पालकांचा पाठिंबा असणं हे तेवढच महत्वाच असतं. यशस्वी कलावंत सर्वांनाच माहित असतात पण त्यांच्या जडणघडणीसाठी पालकांनी घेतलेले कष्ट हेही लोकांसमोर यावेत यासाठी नाटयसंस्कारने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रचंड मस्ती करायचा त्याला सुट्टीत कशात तरी अडकवायच म्हणुन नाटय संस्कार मध्ये टाकले. पण आज जो काही सुबोध आहे, त्याचा पाया नाटयसंस्कार मधे प्रकाश पारखी सरांमुळे घातला गेला असे उद्गार सुबोध भावेच्या आईने काढताच टाळयांचा कडकडाट झाला. ईशा च्या आईने म्हणजेच गायत्री दातारच्या आईने एक किस्सा सांगीतला. गायत्री दातार लहानपणी नाटय संस्कारच्या शिबिरात असताना तीने सुबोधची मुलाखत घेतली होती आणि त्यावेळी मलापण तुमच्याबरोबर काम करायचं आहे अस ती म्हणाली. तेव्हा सुबोधने मात्र तिला आधी शिक्षण पूर्ण कर आणि मग काम करु असं सांगीतल आणण तीचं शिक्षण झाल्यावर तिला तिच्या पहिल्याच सिरीयल मधे (तुला पाहते रे) सुबोध भावे बरोबर काम करण्याची संधी तिला मिळाली. सोनाली कुलकर्णीच्या आईने सांगीतले की मी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. तिच्या भावाने म्हणजे संदीपने तिला नाटय संस्कारला पाठवले. तिचा पाया पक्का झाला आणि रंगमंचावरील सगळी कामे आपण केली पाहिजेत हा संस्कार पारखी सरांनी ठेवला.

शिवानी रांगोळे अतिशय बडबडी होती. नाटयसंस्कार मधे तिने केलेली ग्रामीण ढंगाची नाटयछटा आजही नुकत्याच झालेल्या एका मालीकेच्या निवडीसाठी उपयोगी पडली. या पालकांचा सत्कार करताना सहाही कलाकारांच्या आई ह्या शिक्षिका होत्या हा विलक्षण योगायोग होता व त्यांचा सत्कार आमदार मेधा कुलकर्णी या सुद्धा एका शिक्षिकेच्या हस्तेच झाला . राजकारणातील स्रीयांवर खरोखरच वस्तुनिष्ठ चित्रपट काढला तर मला आवडेल असे उद्गार आमदार मेधा कुलकर्णी यांनी काढले. या प्रसंगी नाटयसंस्कार कला अकदमीच्या विश्वस्त दिपाली निरगुडकर, संध्या कुलकर्णी तसेच कार्यकारी विश्वस्त केतकी चंद्रात्रेय, पूजा पारखी व संस्थेचे सभासद उपस्थित होते. समारोप करताना १ मे पासुन सुरु होणाया होण्याऱ्या नाट्यप्रशिक्षण शिबिरासाठी इच्छुक मुले व पालक यांच्याशी संस्था प्रमुख श्री प्रकाश पारखी यांनी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम सहकार उद्यान, नळसटॉप येर्थे सायंकाळी 5 वा. पार पडला.

नाटयसंस्कार कला अकदमीच्या वतीने २८ एप्रिल रोजी एक अनोखा कार्यक्रम

रविवार सत्र ( ७ ते १६ वयोगटासाठी )

रविवार दि. ३० जून रोजी  रविवार सत्रा संबंधी श्री. प्रकाश पारखी सरांचे पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याखान आयोजित केले आहे.
वेळ: सायं. ५ ते ६
स्थळ: सहकार उद्यान, निसर्ग हाॅटेलच्या शेजारील रस्ता, एरंडवणा
या कार्यक्रमाचे वेळी पालकांना फी भरून प्रवेश घेता येईल.
रविवार दि. ७ जुलै २०१९ या दिवशी रविवार सत्र सुरु होणार आहे.
वयोगट: ५ ते ७
वेळ: सकाळी १० ते १२
स्थळ:  ग.रा. पालकर शाळा
वयोगट: ८ ते १६
वेळ: सकाळी १० ते १.००
स्थळ: kids planet भरतकुंज सोसायटी, (छत्रे सभागृहासमोर)
वयोगट ८ ते १६
वेळ:  दुपारी २.०० ते ५.००
स्थळ: वनिता समाज शाळा, (टिळक रोड)
रविवार सत्र ( ७ ते १६ वयोगटासाठी )

जानेवारी

२० जानेवारी

हिंदी / इंग्रजी नाट्यछटा स्पर्धा आणि बक्षीस समारंभ पुणे विभाग

२७ जानेवारी

हिंदी / इंग्रजी नाट्यछटा स्पर्धा आणि बक्षीस समारंभ पिंपरी, चिंचवड, निगडी विभाग

मे

उन्हाळी नाट्य शिबिरे

१ ते १० मे

ग. रा. पालकर शाळा, कर्वेनगर, पुणे

११ ते २० मे

हुजूरपागा लक्ष्मीरोड, पुणे

२१ ते ३० मे

हुजूरपागा, कात्रज, पुणे

जुलै

७ जुलै ते ८ डिसेंबर

रविवार सत्र : कात्रज / कर्वेनगर

२१ जुलै

मराठी नाट्यछटा स्पर्धा-पुणे विभाग

२८ जुलै

अंतिम फेरी व बक्षीस समारंभ

ऑगस्ट

४ आगष्ट

मराठी नाट्यछटा स्पर्धा, निगडी

११ आगष्ट

अंतिम फेरी व बक्षीस समारंभ

१८ आगष्ट

बालनाट्यसंस्कार परीक्षा (प्रथम) पुणे, निगडी, चिखली, रत्नागिरी

२५ आगष्ट

महाअंतिम फेरी, मराठी नाट्यछटा स्पर्धा

सप्टेंबर

अभ्यास नाट्य स्पर्धा

नोव्हेंबर

किशोरनाट्यसंस्कार परीक्षा (द्वितीय)
१७ नोव्हेंबर

पुणे विभाग, रत्नागिरी विभाग

२४ नोव्हेंबर

निगडी विभाग

२५ नोव्हेंबर

चिखली विभाग

डिसेंबर

८ डिसेंबर

रविवार सत्र : समारोप

२२ डिसेंबर

वर्धापन दिन

आमचे यशस्वी कलाकार

सुबोध भावे

शिवानी रंगोले

सोनाली कुलकर्णी

lokesh

लोकेश गुप्ते

शिवराज वायचळ

सक्षम कुलकर्णी