नाटय परिक्षा

 

बाल नाटय संस्कार : 

  1. ७ वर्षावरिल कोणालाही स्वत:चे नाव, पत्ता, शिक्षण, आवड कॅमेरा समोर परिक्षेत सांगावे लागते. या परिक्षेमुळे हा सराव करताना स्पष्ट शब्दोच्चार, सभाधीटपणा वाढतो.

२ . कथाकथन, नाटय प्रवेश, नाटयछटा, एकपात्री स्वागत :    

यामुळे स्मरणशक्तीचा विकास होतो. एखादा संवाद, एखादी गोष्ट वाचल्यावर / ऐकल्यावर पुन्हा ती सांगण्यासाठी स्मरणशक्ती, ती समर्थपणे सांगण्यासाठी आवाजातील बदल { वाचिक अभिनय } , भावना व्यक्त करण्यासाठी आवाजा बरोबरच शरीराची होणारी हालचाल { आंगिक } अभिनय यांचा विकास होतो .

३ . अभिनय गीत :

संगीत हे मानवी मनाला आनंद देणारे, उत्साह वर्धक औषध आहे. अंगाई गीता पासुन त्याची सुरुवात होते. शब्दोच्चाराच्या प्रगतीसाठी बडबड गीतांची मदत घेतली जाते आणि बाल गीतांमुळे त्यांचे मनोरंजन तर होतेच पण सुर, लय व तालाची जाण येते शिवाय गीतातील भावनांमुळे सुर, लय, ताल याचा अभिनयाशी संबंध जोडला जातो .

४ . सात स्वर सुरात म्हणणे :

शास्त्रीय संगीताची सुरुवात सरगमने म्हणजे सात स्वरांनी होते. ते सुरात म्हणणे म्हणजे संगीताबद्द्ल जाण निर्माण करणे होय. ही जाण त्याचे सांगीतीक जीवन समृध्द करतेच पण वाचिक अभिनयातील आवाजाच्या विविध छटा प्रकट करण्यास सहाय्यभुत होते.

५ . नक्कल करणे :

माणुस भाषा शिकतो तोच मुळात नकलेतून. आई, वडिल, आजु बाजुची मंडळी यांच्या  अनुकरणातुनच आपण भाषा शिकतो. पशु, पक्षी यांचे आवज, विविध फेरीवाले, त्यांच्या विकण्याच्या पध्द्ती, त्यांनी केलेल्या आवाजाचा वापर याचे निरिक्षण आणि अनुकरण यातुन वाणी संस्कार होत असतात.

नाटय परिक्षा कशी दयावी –

सर्व कलांच्या परिक्षा आहेत पण नाटय विषयाची नाही. व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन नाटक आहे. तर सर्वांनी नाटय शास्त्र शिकले पहिजे आणि जगाचा रंगमंचावरिल आपली कोणतीही भुमिका प्रभावी केली पाहिजे . याच उद्देशाने नाटय प्रशिक्षणाचे काम करता करता नाटय परिक्षा हा उत्तम उपाय सापडला आणि प्राथमिक नाटय शास्त्रावरचा अभ्यास करण्याकरीता अभ्यासक्रम ठरवला.

बाल नाटय संस्कार : 

ही पहिली परिक्षा ७ वर्षावरील कोणालाही देता येते . किमान ७ वयोगट असल्याने या परिक्षेला लेखी पेपर नाही. ही परिक्षा कॅमेरा समोर घेतली जाते.

१. स्वतःचे संपुर्ण नाव पत्ता सांगणे , शिक्षण शाळेचे नाव सांगणे आणि भरतमुनी कोण होते, त्यांनी काय लिहिले हे सांगता आले की त्यासाठी ५ पैकी गुण देण्यात येतात.

२. कथाकथन (गोष्ट)/ नाटयछटा / नाटय प्रवेश यांपैकी कोणताही एक प्रकार साभिनय करुन दाखवायचा आहे . वाचिक, आंगिक अभिनय व विषय यांचा विचार करुन २० पैकी गुण दिले जातात.

३. अभिनय गीत : बालवाडी , शाळे पासुन अनेक बालगीते , बडबड गीते शिकवली जातात असे कोणतेही एक गीत किंवा कविता साभिनय सादर करायचे आहे . सुर , ताल , अभिनय या साठी १० पैकी गुण देण्यात येतात.

४. आरोह – अवरोह शास्त्रीय संगीतातील सरगम (सा, रे, ग, म, प, ध, नी, सां) सुरात म्हणता आले तर ५ पैकी गुण दिले जातात.

५. नक्कल : प्राणी , पक्षी , वादये यांच्या आवाजाची किंवा फेरिवाले, घरातील व्यक्तिंची किंवा टिव्हि मालीका – चित्रपटातील पात्रांची हुबेहूब नक्कल केल्यास ५ पैकी गुण दिले जातात.

६. एकुण परिणाम पाहुन ५ पैकी गुण दिले जातात. असे एकुण ५० पैकी गुण दिले जातात. या परिक्षेचे प्रमाण पत्र समारंभ पूर्वक देण्यात येते.
असा हा पहिल्या परिक्षेचा सोप्पा अभ्यास क्रम आहे . दरवर्षी या परिक्षा घेतल्या जातात याबाबत अधिक महिती वेळोवेळी वेबसाईट वर दिसेल.