नाटय परीक्षा 2021

नाटय परीक्षा कशासाठी ?

नाटयसंस्कार प्रथम परीक्षा : ७ वर्षांवरील कोणालाही देता येईल.
(Online कॅमेरा समोर ५० मार्कांची परीक्षा)
७ वर्षांवरील कोणालाही स्वतःचे नाव,पत्ता,शिक्षण, आवडता छंद व भरतमुनींची माहिती सांगता आली
पाहिजे .सभाधीटपणा , स्पष्ट शब्दोच्चार यासाठी परिक्षेचा उपयोग होतो . ( त्याला ५ गुण दिले जातात .)

एखादी गोष्ट वाचल्यावर,ऐकल्यावर पुन्हां ती सांगण्यासाठी आवाजातील बदल ( वाचिक अभिनय ),
भावना व्यक्त करण्यासाठी आवाजाबरोबर शरीराची होणारी हालचाल ( आंगिक अभिनय ) याचा
विकास होतो. कथाकथन,नाट्यप्रवेश , नाटयछटा ,एकपात्री ,स्वगत , गोष्ट या पैकी कोणतेही एक सादर
करण्यासाठी २० गुण दिले जातात .

अभिनय गीत
संगीत हे मानवी मनाला आनंद देणारे उत्साहवर्धक औषध आहे . अंगाई गीतापासून त्याची सुरुवात
होते . शब्दोच्चाराच्या प्रगतीसाठी बडबड गीतांची मदत घेतली जाते . बालगीतांमुळे मनोरंजन तर
होतेच त्याचबरोबर सूर — लयीची जाण ही मुलांना होते , शिवाय गीतातील भावनांमुळे सूर , लय , ताल याचा अभिनयाशी
संबंध जोडला जातो . परीक्षेत अभिनय गीत किंवा बडबडगीत तालात व सुरात सादर करण्यासाठी १० गुण ठेवण्यात आले आहेत

सातस्वर सुरात म्हणणे
भारतीय शास्रीय संगीताची सुरुवात सरगम ने म्हणजे सात स्वरांनी होते . ते सुरात म्हणणे म्हणजे संगीताबद्दल जाण निर्माण करणे होय . ही जाण त्यांचे सांगितीक जीवन समृद्ध करतेच , पण वाचिक अभिनयातील आवाजाच्या विविध छटा प्रकट करण्यास सहाय्यभूत होते . परीक्षेमध्ये शास्त्रीय संगीतातील आरोह — अवरोह म्हणण्यासाठी  ५ गुण दिले जातात .

नक्कल करणे

माणूस भाषा शिकतो तीच मुळात नकलेतून , आई — वडील , आजूबाजूची मंडळी , त्यांच्या
अनुकरणातून आपण भाषा शिकतो . पशु – पक्षी यांचे आवाज, विविध फेरीवाले त्यांच्या विकण्याच्या
पद्धतीत त्यांनी केलेल्या आवाजाचा वापर अनुकरण आणि निरीक्षण तर असतेच शिवाय त्यातून
वाणीसंस्कार होत असतात. यापैकी एकाची नक्कल परीक्षेमध्ये करण्यासाठी ५ गुण ठेवले आहेत .

वरील सर्व गोष्टींचा एकूण प्रभाव किती पडतो , यासाठी परिक्षेत ५ गुण ठेवले आहेत .
अशातऱ्हेने पहिल्या परीक्षेसाठी ५० मार्कांचे विभाजन केलेले आहे .

नाटय परीक्षा विषयी महत्त्वाचे 
सर्व विषयांच्या परीक्षा आहेत पण सर्व कलांसमावेशक नाटयकलेची परीक्षा नाही . सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी नाटक हे प्रभावी माध्यम आहे . केवळ कलाकार होण्यासाठी नव्हे तर जगातील कोणत्याही प्रकारची भूमिका करण्यासाठी नव्हे तर
प्रभावी करण्यासाठी प्रत्येकाने नाटयशास्त्र शिकले पाहिजे . नाटयशास्त्र शिकायचे म्हणजे फक्त नाटकात काम करणे  नव्हे तर नाटकात काम करताना भूमिकेचा अभ्यास कसा करावा या साठी शिकावे लागणारे शास्त्र म्हणजे नाट्य शास्र इयत्ता १२ वी नंतर नाटयशास्त्र पदविका व त्या पुढेही शिक्षण घेता येते . पण शालेय स्तरावर नाटकाची कोणतीही परीक्षा नाही . त्यामुळे शालेय अभ्यास क्रमातही हा विषय दुर्लक्षीत आहे .  जगभर थिएटर इन स्कूल चळवळ सुरु असताना भरत मुनींच्या भारतात, नाटकाच्या प्रचंड लोकप्रियता असलेल्या महाराष्टात नाटकाबद्दल उदासीनता का ? आणि नाटय परीक्षा म्हणजे मुलांवर लादलेले ओझे नाही तर त्याची कला क्षमता जाणून घेण्यासाठी हा एक आनंदी दायी मार्ग आहे . या परीक्षेला बसताना पास नापास हा मुद्दाच नसावा . आपला पाल्य किंवा परीक्षार्थी हा कोणत्या विषयात किती गुणांपर्यंत जातो आहे ते पहावे . या मधे त्याचा कल ही कळणार  आहे . त्यामुळे जागरुक आणि सुजाण पालकांनी याचे निरीक्षण करून विदयार्थांच्या कलाप्रमाणे त्या क्षेत्रात त्याला अधिक प्रशिक्षण कसे देता येईल हे पहावे

नाटयसंस्कार प्रथम परिक्षा Online देण्यासाठी खाली दिलेल्या नियमांची पूर्तता करावी :

या Online परीक्षेचे शुल्क रू ४००/- असुन  ते ऑनलाइन बॅंकेत जमा करायचे आहेत.

बॅंक तपशील /Account details

Bank – ICICI

Account holder name – natya sanskar kala academy

Saving Account no – 187501001463

Ifsc code – ICIC0001875

संस्थेच्या  8484930335 या नंबरवर

आधार कार्ड (फोटो id पुरावा म्हणून ) व

परीक्षा फी ऑनलाइन ट्रान्सफर केल्यावर त्याचा स्क्रीन शॉट आपल्या नावासकट

8484930335 या नंबरवर whatsapp  पाठवा. त्या नंतर आपल्याला Form दिला जाईल.

परीक्षा फी भरण्याची व प्रवेश घेण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२१.

Recent Comments
    Archives
    Categories
    • No categories