नाटुकल्यांच्या स्पर्धा

भालभा केळकर स्मृती करंडक

नाटुकल्यांच्या स्पर्धा

लहानपणीच नाट्याची आवड निर्माण व्हावी या साठी दहा वर्षांच्या आतील मुलांनी १० मिनीटाचे नाटुकले सादर करावयाचे. या स्पर्धा १९९२ पासुन सुरु केल्या . प्राथमिक शाळा , बाल भवन आणि हौशी संघांनी याला खुप छान प्रतिसाद दिला. या निमित्ताने शिक्षकांसाठी लेखन कार्यशाळा तसेच नाट्याच्या इतर तंत्राचे मार्गदर्शन ही शिक्षकांना केले . अनेक नामवंत कलाकार या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणुन लाभले . या मध्ये डॉ. श्रीराम लागु , ललिता पवार , शरद तळवलकर , चित्तरंजन कोल्हटकर , दिनानाथ टाकळकर , जयमाला शिलेदार , सोनाली कुलकर्णी , भाग्यश्री देसाई , प्रकाश इनामदार त्याच प्रमाणे अनेक शिक्षण तज्ञ प्र. ल. गावडे , न. म. जोशी यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले . रौप्य महोत्सवी वर्ष धुमधडाक्यात साजरे झाले आणि त्यानंतर या स्पर्धा ‘ महाराष्ट्र कलोपासक ‘ या संस्थेच्या सहकार्याने सुरु झाल्या . मंगेश शिंदे , राजन ठाकुर देसाई या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या विशेष प्रयत्नांतून या स्पर्धा अधिक भव्य प्रमाणात होत आहेत .
दहा वर्षाखालील मुलांसाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा महाराष्ट्रातील एकमेव आहेत . या स्पर्धांची जानेवारी महिन्यात प्रवेश प्रक्रीया सुरु होते . प्राथमिक शाळा बालभवन व रजिस्टर संस्थांना यात भाग घेता येतो.