संस्थे विषयी

संस्थेचा इतिहास

बाल रंगभुमीचे कार्य उभारुन ही चळवळ महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचवावी या साठी १९७८ साली नाटयसंस्कार ची स्थापना झाली. बाल नाटयासाठी नाटय शास्त्राचे प्रशिक्षण देत असताना त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होत आहे हे लक्षात आले, आणि मग प्रशिक्षणाचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी १९८८ साली नाटय संस्कार कला अकदमी या नावाने संस्था रजिस्टर झाली.

आजतागायत संस्थेने अनेक नाटय प्रशिक्षण , बालनाटय निर्मीती व प्रयोग , युवा नाटय , अनेक नाटय स्पर्धांमधे सहभाग आणि यश संपादन केले . पुणे शहराबरोबरच पिंपरी – चिंचवड , आकुर्डी , निगडी सारख्या उपनगरात तसेच बरामती , इंदापुर , श्रीरामपुर, बेळ्गाव , व इंदोर इ. शहरांमध्ये कार्य शाळा घेतल्या.  तर भारताबाहेर अमेरिकेत लॉस एंजेलिस च्या महाराष्ट्र मंडळातही नाट्यकार्य शाळा घेतली .

संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांचे बरोबर आजपर्यंत कृष्णदेव मुळगुंद , सौ. सुमेधा महाबळ , सदाशिव चव्हाण , शीतल केतकर , अनंतराव जोशी यांनी विश्वस्त म्हणुन काम पाहीले.

संस्थेची उद्दिष्टे:
१. व्यक्तिमत्व विकासासाठी नाटय प्रशिक्षण देणे. त्यासाठी नाटय विद्यालय काढणे. प्रशिक्षण वर्ग चालवणे. गावोगावी नाटय शिबिरे व मेळावे भरविणे.
२. बाल रंगभूमी समृदध करणे, त्यासाठी दर्जेदार बालनाट्यांची निर्मिती करणे व त्याचे प्रयोग शहरातील व खेडयातील मुलांना दाखविणे, बाल कलाकारांना प्रोत्साहन देणे.
३. युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी निरनिराळ्या सपर्धा आयोजित करणे. निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणे, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम बसवून त्याचे प्रयोग सादर करणे.
४. मनोरंजनाचे माध्यमातून समाज प्रबोधन करणे व त्यासाठी व्ही.डी.ओ. फिल्म लघुपट तयार करणे.