संस्थापक - प्रकाश पारखी

प्रकाश पारखी

नाट्य संस्कार कला अकादमी, पुणे , संस्थापक व प्रमुख विश्वस्त, नकलाकार, गुणवंत कामगार, बालनाट्य
लेखक व दिग्दर्शक, नाट्य मार्गदर्शक व्याख्याते, नाट्य माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करणारे,
पथनाट्य लेखक व प्रशिक्षक, अभ्यास नाट्य चळवळीचे संकल्पक. कला विषयाच्या हस्तपुस्तिकेत
नाट्यविषयक उपक्रमांचे समावेशक.
महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम समितीचे माजी सदस्य. २०१८ साली बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.
महाराष्ट्राबाहेर परदेशातही एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण.

पुरस्कार
 • गुणवंत कामगार पुरस्कार (१० मे १९८७) :  हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लि., पिंपरी येथे कार्यरत असताना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार. महानगरपालिका, केसरी मराठा संस्थांकडून गौरव.
 • बाल रंगभूमी कार्यगौरव उदय सिंह पाटील पुरस्कार (१९८६): भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे गौरव.
 • “आर्टिस्ट ऑफ द इयर” : सेंट्रल गव्हर्नमेंट कल्चरल कमिटी तर्फे
 • नाट्य गौरव (१९९८) : बाल रंगभूमी कार्याबद्दल कला गौरव प्रतिष्ठान तर्फे
 • पर्वती पुण्यभूषण पुरस्कार (२००८)
 • अखंड नाट्यसेवा पुरस्कार (२५ मे २०१२) : अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे
 • स्वानंद पुरस्कार (२६ जानेवारी २०१४)
 • जीवन गौरव पुरस्कार (२२ जून २०१४) : साने गुरुजी संस्कार साधने तर्फे
 • बालगंधर्व रंगमंदिर पुरस्कार (२५ जून २०१४)
 • बाळासाहेब भारदे स्मृति पुरस्कार (२८ जानेवारी २०१८)

सन्मान

 • ११ सप्टेंबर १९८८ : “सारस जेसी” संस्थेच्या तर्फे
 • ५ जुलै १९९१ : पुणे मराठी ग्रंथालया तर्फे
 • १९९६ : बाल रंगभूमीवरील कार्याबद्दल गौरव
 • १३ सप्टेंबर २००७ : वंचित विकास निर्मळ रानवारा संस्थेतर्फे
 • १४ जून २००८ : अखिल भारतीय नाट्य परिषदे तर्फे