प्रकाश पारखी
सन्मान
- ११ सप्टेंबर १९८८ : “सारस जेसी” संस्थेच्या तर्फे
- ५ जुलै १९९१ : पुणे मराठी ग्रंथालया तर्फे
- १९९६ : बाल रंगभूमीवरील कार्याबद्दल गौरव
- १३ सप्टेंबर २००७ : वंचित विकास निर्मळ रानवारा संस्थेतर्फे
- १४ जून २००८ : अखिल भारतीय नाट्य परिषदे तर्फे
२०११ सालापासून नाट्यसंस्कार कला अकादमी च्या विश्वस्तपदी रुजू. विश्वस्तपदावर येण्यापूर्वीपासून नाट्यसंस्कारमध्ये कार्यरत. याच बरोबर गेली अनेक वर्ष सातत्याने रंगभूमीवर सक्रिय आहेत. त्यांचे शिक्षण बी. कॉम पर्यंत झाले आहे व औरंगाबाद येथून नाट्यशास्त्राचा डिप्लोमा केला आहे. अनेक व्यावसायिक नाटके, एकांकिका, सिरीयल, जाहिराती (पी. एन. जी.) आणि चित्रपट यामधून अभिनय. तसेच आकाशवाणी व रेडिओ मिरची वर कार्यक्रम. बालरंगभूमीवर गेली २५ वर्ष काम सुरु आहे आणि अभिनयाची अनेक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत.
शिक्षण Electronics Engineer.
Whizz Engineering Services Pvt. Ltd. ही स्वतःची कंपनी.
२०१० पासून नाट्यसंस्कार कला अकादमी साठी काम सुरू केले. २०१७ ला नाट्यसंस्कार ची विश्वस्त म्हणून नियुक्ती.
लहान पणापासून नाटक ,अभिनय, नृत्य याची अतिशय आवड आणि वक्तृत्व, अभिनय, नृत्य , खेळ ,आणि शैक्षणिक विषयात अनेक पुरस्कार. आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार. सुंदर मी होणार, तुझे आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा या नाटकातून प्रमुख भूमिका. “बळी” नाटिकेला बालकुमार साहित्य परिषदेचा लेखन पुरस्कार. आकाशवाणी वर एका मालिकेचे लेखन , तसेच बळी, बिल्लू बिलंदर कल्लू कलंदर , सावली , गोष्ट एका कवितेची या नाटकांचे सादरीकरण. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा उत्कृष्ट नाट्यलेखनासाठीचा पुरस्कार सावली आणि गोष्ट एका कवितेची या नाटकांसाठी मिळाला. नाट्यछटा पंचविशी हे पुस्तक प्रकाशित. ४० – ४५ नाट्यछटांचे लेखन तसेच २० ते २५ नाटिकांचे लेखन केले आहे. ११९६पासून मुलांसाठी नाट्यप्रशिक्षणाची शिबिरे आयोजित केली आहेत. अनेक स्पर्धा मधून लेखन दिग्दर्शन अभिनयाची पारितोषिके. अनेकवेळा नाट्यछटा, नाट्य , अभ्यासनाट्य स्पर्धा चे परीक्षण केले आहे.
- नाट्यछटा स्पर्धा : दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा १९९० सालापासून सर्व वयोगटासाठी दरवर्षी जानेवारी व ऑगस्ट महिन्यात घेतली जाते. जानेवारीत हिंदी आणि इंग्रजी व ऑगस्ट मध्ये मराठी नाट्यछटा स्पर्धा पुणे विभाग आणि पिंपरी-चिंचवड, निगडी विभागाच्या अनेक केंद्रांवर होते.
- उन्हाळी नाट्यशिबिरे : उन्हाळ्याच्या सुट्टीत ५ ते १६ वर्ष वयोगटासाठी नाट्य शिबिरे घेतली जातात. नाट्यप्रशिक्षणाबरोबर सभाधीटपणा, आत्मविश्वास, पाठांतर, शिस्त, प्रसंगावधान, समयसूचकता, इ. गोष्टी मुलांमध्ये रुजवत त्यांच्यावर “नाट्यसंस्कार” केले जातात.
- रविवार सत्र : जुलै ते डिसेंबर या काळात प्रत्येक रविवारी ५ ते १६ वर्ष वयोगटासाठी नाट्य शिबीर घेतले जाते. यात मुलांच्या बदलत्या मानसिकतेचा विचार करून संगणकाच्या युगात त्यांना आभासी विश्वापासून बाजूला नेत त्यांना भावतील असे विषय घेऊन नाट्यप्रशिक्षण व प्रयोग केले जातात.
- शिक्षकांसाठी नाट्य कार्यशाळा :व्यक्तिमत्व विकासाचे एक प्रभावी साधन म्हणजे नाट्यशास्त्र. त्याची शिक्षकांना माहिती द्यावी, विद्यार्थ्यांमध्ये नाट्य विषयाची आवड निर्माण करावी, त्यांना नाट्यविषयक मार्गदर्शन कसे करावे, त्यांच्याकडून नाट्यनिर्मिती कशी करून घ्यावी, या बाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते.
- अभ्यास नाट्य स्पर्धा : गणित, इतिहास, भूगोल या सारखे कंटाळवाणे व अवघड विषय नाटकाच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने नाट्यमय रीतीने मुलांसमोर सादर केल्यास अवघड गोष्टी सोप्या होतात. आणि त्यातूनच मुलांचा व्यक्तिमत्व विकासही होतो. यासाठी गेल्या ८ वर्षांपासून ‘अभ्यासनाट्य स्पर्धा’ चालू आहेत.
- युवा कार्यशाळा : युवकांना कलाक्षेत्रात संधी मिळावी व त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ‘युवा कार्यशाळा’ सुरु केल्या गेल्या . यामध्ये नाटकाला लागणाऱ्या सर्व अंगांची ओळख युवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून दिली जाते.
- नाट्यपरीक्षा : नृत्य, गायन, चित्र इ. विषयांवर शासनातर्फे परीक्षा घेतल्या जातात. परंतु ह्या सर्व गोष्टी समाविष्ट असलेल्या नाट्य शास्त्राची परीक्षा आत्ता पर्यंत घेतली गेली नाही. हे लक्षात घेऊन दोन वर्षांपासून बालनाट्यसंस्कार, किशोरनाट्यसंस्कार आणि कुमारनाट्यसंस्कार परीक्षा आमच्या विविध केंद्रांतून घेतल्या जातात.
अनुराधा कुलकर्णी
अंजली दफ्तरदार
सोनाली पारखी
केतकी चंद्रात्रेय
क्षितिजा आगाशे
आशा काळे
अरुण पटवर्धन
पुष्कर देशपांडे
धनंजय सरदेशपांडे
अमोल जाधव
धनंजय कुलकर्णी
राजश्री काळे
श्रीराम ओक
पद्मजा मोरे
तृप्ती टिंबे
दीप्ती असवडेकर
निलेश दातार
अचिंत्य बाक्रे
श्वेता बेडेकर
श्रिया ढवळे
सुबोध भावे
विनिता पिंपळखरे
अश्विनी आरे
रवी कुलकर्णी
संतोष मोरे