शालेय विद्यार्थांचा सहभाग : नाट्यसंस्कार कला अकादमीच्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण
पुणे : दुष्काळ, मोबाईल वापराचा अतिरेक या आणि इतर समाजाला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर शालेय विद्यार्थांनी प्रकाश टाकला. निमित्त होते ते नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे रविवारी (दि. २०) आयोजित करण्यात आलेल्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे. या स्पर्धा हुजूरपागा शाळेत झाल्या. विजेत्या स्पर्धकांना हिंदी नाट्य सृष्टीतील लेखक-कलावंत अभिजित चौधरी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेत १०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
इंग्रजी माध्यम : गट १ : ज्युनियर/सिनियर : प्रथम आरोही भामे, द्वितीय अथर्व भिडे, उत्तेजनार्थ आर्वी कदम.
गट २ : पहिली/दुसरी : प्रथम श्रेया जाधव.
गट ३ : तिसरी/चौथी : प्रथम शर्व दाते, व्दितीय सुरज डांगे.
गट ४ : पाचवी/सहावी : प्रथम ओजस बकरे, द्वितीय अमृता काळे, उत्तेजनार्थ अद्वैत राइलकर.
गट ५ : सातवी/आठवी : प्रथम आरोही नानजकर, निशांत घोडे.
गट ६ : नववी/दहावी : प्रथम आशिष राइलकर.
लेखन विभाग : विद्यार्थी गट : यश काळे. पालक गट : अचिंत्य बकरे.
हिंदी माध्यम :
गट १ : शिशू गट : प्रथम अन्वित हर्डीकर, द्वितीय ओवी दोषी.
गट २ : पहिली/दुसरी : प्रथम श्रीया जाधव.
गट ३ : तिसरी/चौथी : प्रथम स्वरूपा झांबरे, दिव्तीय पल्लवी माने. उत्तेजनार्थ सांची कुंभार, स्वामिनी कुंभार, दिव्या रामरूले.
गट ४ : पाचवी/सहावी : प्रथम अद्वैत राईलकर, अनिया सिंग, उत्तेजनार्थ दृष्टी मोरे, खुशी भंडारी.
गट ५ : सातवी/आठवी : प्रथम स्वरांगी खरे, द्वितीय राही बिरादार, उत्तेजनार्थ सिद्धान्त भंडारी, संस्कृती शिंदे, श्रुती शिंदे.
गट ६ : नववी/दहावी : प्रथम अनिश राईलकर.
खुला गट : द्वितीय शंतनू भोसले, उत्तेजनार्थ रेणुका पुरंदरे.
अभिजित चौधरी म्हणाले, चित्रपटाकडे ओढा असला तरी नाटकाची उपयुक्तता भविष्यातही कायम राहणार आहे. आयुष्यात नाट्यसंस्कार खूप उपयोगी पडतात.
अकादमीचे प्रमुख विश्वस्थ प्रकाश पारखी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.
दीपा परांजपे, मुग्धा वडके, सुचित्रा मेडदकर, अमर देवगावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
पद्मजा मोरे आणि तृप्ती टिंबे यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो (see attached) : नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्यछटा स्पर्धेतील विजेत्यांसमवेत अभिजित चौधरी, प्रकाश पारखी व इतर.