रविवार सत्र
रविवार दि. ३० जून रोजी रविवार सत्रा संबंधी श्री. प्रकाश पारखी सरांचे पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याखान आयोजित केले आहे.
वेळ: सायं. ५ ते ६
स्थळ: सहकार उद्यान, निसर्ग हाॅटेलच्या शेजारील रस्ता, एरंडवणा
या कार्यक्रमाचे वेळी पालकांना फी भरून प्रवेश घेता येईल.
स्थळ: ग.रा. पालकर शाळा
स्थळ: kids planet भरतकुंज सोसायटी, (छत्रे सभागृहासमोर)
स्थळ: वनिता समाज शाळा, (टिळक रोड)
फी: वयोगट ५ ते ७
फी: वयोगट ८ ते १६
वरील फीमधे दोन्ही नाट्यपरीक्षा व नाट्यछटा स्पर्धा फी समाविष्ट आहे.
जुलै – ऑगस्ट दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा व बालनाट्यसंस्कार परीक्षेची तयारी करून घेतली जाईल.
सप्टेंबर – ऑक्टोबर किशोरनाट्यसंस्कार परीक्षेची तयारी करून घेतली जाईल. तसेच व्यावसायिक बालनाट्यासाठी मार्गदर्शन.
नोव्हेंबर – डिसेंबर विविध स्पर्धांमधे सहभाग व सत्र समारोप सादरीकरण
१५ जून पासून नावनोंदणी सुरू होईल.
पूजा पारखी – ९५४५८०९८००
युवा नाट्य कार्यशाळा

Theatre workshop
With its great legacy of delivering renowned theatre artists through effective and profound teaching methods, Natya Sanskar Kala Academy founded by Mr Prakash Parkhi, is offering you yet another Theatre workshop giving you a great platform to learn and explore all the nuances of Theatre as an art. Come join us for this exemplary Journey and take away one of the great experiences of your life !
नाटयछटा म्हणजे काय?
मराठी साहित्यामधे कै. दिवाकर यांनी हा प्रकार आणला. आंग्ल कवी रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या मोनोलॉंग या काव्य प्रकाराच्या वाचनाने प्रभावित होऊन दिवाकरांनी नाटयछटा लेखन सुरू केले.
नाटयछटेत प्रत्यक्ष बोलणारे पात्र एकच असते, स्वगता प्रमाणे स्वता:शी व इतरांशी ते बोलत असते. दुसरे पात्र काल्पनिक – त्याच्याशी कधी संवाद करते, पण उघडपणे किंवा प्रत्यक्ष नाही. उदाहरणार्थ – आई हाक मारत आहे, तर त्या हाका ऐकू येत नाहीत; नाटयछटेतील पात्र म्हणते ‘ए आई, आलो आलो! सारख्या काय हाका मारतेयस?
नाटयछटेचा मनोरंजन हा प्रमुख हेतु असला तरी दिवाकरांच्या नाटयछ्टेमध्ये मनुष्य स्वभावातीत विरोधाभास स्वभावदोष सामाजिक प्रश्नांची सल किंवा जाणीव प्रामुख्याने दिसून येते. हसत हसत त्या पात्राच्या बोलण्यातून डोकावणारा उपरोध रसिकांच्या ह्रदयाला भिडत होता.
नाटयछटा म्हणजे कथाकथन नाही किंवा प्रसंग कथन नाही. अतिशय थोडया वेळात एका व्यक्तिच्या स्वभाव वैशिष्टांच्या परिचय नेमक्या शब्दात नेमक्या प्रसंगात उभा करणे म्हणजे नाटयछटा.
नाटयछटा लेखन कसे करा
लेखणी उचलण्यापूर्वी इतर नाटयछटा वाचा,अभ्यासा,नाटयछटा सादरीकरण डोळसपणे पहा,चिंतनाकच्या मुशीतून सुयोग्य विषय निवडा,पात्रानुरुप,स्थानानुरुप भाषा बदलते का अन् कशी ते अभ्यासा अन् मग विरामचिन्हांचा योग्य वापर करुन,कल्पकतेने,प्रभाविपणे अचुक नेमक्या शब्दात,नेटकेपणाने मांडणी करा.
‘आपल्या अनुभवांची,विचारांची,व्यक्तिविशेषांची,घटना,- प्रसंगाची नाटयात्मक पध्दतीने नेमक्या – नेटक्या शब्दात केलेली कलात्मक मांडणी गदयरुपात करणे म्हणजे नाटयछटा.’संवाद,स्वगत,किंवा एकपात्री प्रयोग म्हणजे नाटयछटा नव्हे. नाटयछटेत प्रत्यक्ष बोलणारे पात्र एकच असते. ते स्वगताप्रमाणे स्वत:शी आणि त्याचवेळी अन्य पात्रांशीही बोलत असते. घटना,प्रसंग,चिंतन,सुक्ष्म निरिक्षण,वाचन यातून विषय सापडतो. म्हणूनच अनुभवविश्व समृध्द करणे,बहुश्रुत असणे नितांत गरजेचे असते.
नाटयछटा सादरीकरण
नाटयछटेचे प्रथम वाचन करावे. नीट वाचता आली की मग वाचताना तो संवाद आहे त्यामुळे त्यानुसार चढउतार, भावदर्शन समजावून घेऊन वाचावे. असे वाचता वाचता ती नाटयछटा पाठ झाली पाहिजे. पण पाठांतर म्हणजे कविता, पाढे जशा घडाघड म्हणून टाकता तसे पाठ नको. तर ज्या पात्रांची नाटयछटा आपण सादर करीत आहोत ते पात्र सहजगत्या त्याच्या विचाराने बोलत आहे असे प्रेक्षकांना वाटले पाहिजे. त्याकरिता स्पष्ट शब्दोच्चार पाहिजेत व त्यासाठी स्वरनिर्मिती कशी होते, बोलण्यासाठी हवेचा उपयोग कसा होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे.
वाचिक अभिनयाबरोबर आंगिक अभिनयलाही महत्व आहे. नाटकातील भूमिकेप्रमाणे नाटयछटेसाठी संपूर्ण स्टेजवर वावरणे आवश्यक नसते. परंतु आवश्यकतेनुसार प्रवेश करताना किंवा एक – दोन पावले पुढे मागे जाण्यास हरकत नसते. ताठ उभे राहावे. वयोमान जर वृद्धत्व दाखवायचे असेल तरच वाकावे. उभे राहताना पावले जवळ चिटकून उभे राहू नये व पावले फार लांबही ठेऊ नयेत. नाटयछटेच्या पात्रानुसार हातवारे करणे आवश्यक असते. काहीजण उगाच हातवारे करतात, काहीजण हाताची घडी घालून बसतात. प्रसंगाला व पात्राला शोभेल असे हातवारे करणे हे निरीक्षणातून अभ्यासावे. आपला चेहरा हा प्रेक्षकाभिमुख असावा.नाट्यछटेतील पात्राप्रमाणे चेहर्यावरील भाव बदलता आले पाहिजे. नाटयछ्टेतील पात्रांच्या भावभावनेनुसार क्रोध, अहंकार, आनंद, फजिती हे भाव चेहरावर उमटवता आले पाहिजेत.
दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०१९ (मराठी)
२१ जुलै२०१९ रोजी पुणे येथे ७ केंद्रांवरील स्पर्धेत ४०० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला.
अंतिम फेरीत गेलेल्या स्पर्धकांची यादी:
गट क्रमांक | केंद्र | स्पर्धकाचे नाव |
शिशुगट | बालविकास केंद्र | कोणी नाही |
भारतीनिवास केंद्र | कोणी नाही | |
महेश बालभवन | अन्वित हर्डीकर, सीया शेजवलकर | |
ग. रा. पालकर | कोणी नाही | |
अॅम्रो स्कूल | पृथ्वी झांबरे, संकल्प गाडे ,प्राविण्या अंबवले, स्पंदन बुंडेगे, गायत्री जोशी | |
नांदेड सिटी | कोणी नाही | |
एल. बी.एस बालभवन | आरुष सप्रे , अनन्या तारे | |
१ली -२री | बालविकास | श्रीया जाधव, ईरा जोग , वेदिका ओक , अन्वि कदम |
भारतीनिवास केंद्र | कोणी नाही | |
महेश बालभवन | अक्षरा करकरे, अनन्या फडणीस, अक्षरा भगुरकर | |
ग. रा. पालकर | सई कुलकर्णी, मनित हलशिकर, अन्वी कुलकर्णी | |
अॅम्रो स्कूल | ऋग्वेद गंधे, तन्वी अडीवरेकर, अनुरा अंबुळकर, सिद्धी कापसे, देवांशी वाघ | |
नांदेड सिटी | ओवी वाडेकर, यशस्विनी गुप्ता | |
एल. बी.एस बालभवन | अन्वय ढेरे | |
३री-४थी | बालविकास | सुकृत दिक्षित, हर्षवर्धन बनसोडे, रितेश देशमुख, अवंतिका वाबळे, |
ख्याती करोसिया, तनय नाझिरकर, मृण्मयी वीरकर, ऋतुराज काळे | ||
भारतीनिवास केंद्र | नचिकेत शास्त्री, वेद शहा | |
महेश बालभवन | सनत देशपांडे, अक्षरा जाधव, गार्गी भिडे, क्रितीका जोशी | |
ग. रा. पालकर | मिताली मोघे, अवनी गोंडगावकर, अस्मी गोगटे | |
अॅम्रो स्कूल | ध्रुवी मोरे, सई भोसले, साक्षी शिरोडे, आदित्य मिसकिन, शर्व दाते | |
नांदेड सिटी | समृद्धी फरांदे, रिद्धी खाडे, अहना लिमये | |
एल. बी.एस बालभवन | साची कुंभार, पल्लवी साने, वरद मोरे, सावनी दाते | |
५वी -७वी | बालविकास | सई आपटे, श्रीरंग पारखी, आयुष परांजपे, श्रीराम पारखी, दुर्गा करंदीकर |
अद्वैत राईलकर, रिधिमा भट, आर्या साबळे | ||
भारतीनिवास केंद्र | अनय रानडे, श्रेयसी लकारे | |
महेश बालभवन | नयन दिवाळे, ज्योतीरादित्य धुमाळ, सानिका जोशी, हर्षिता सराफ | |
ग. रा. पालकर | तन्वी केतकर, विहान देशमुख, सई गुरव, निषाद साने, मुग्धा जोशी | |
अॅम्रो स्कूल | स्वरूपा झांबरे, तनिष्का परदेशी, वृषाली कदम, दृष्टी मोरे, ईशान सोनावणे | |
नांदेड सिटी | साची मेहता, ऋचा जाधव, पुष्कर कानेगावकर | |
एल. बी.एस बालभवन | रुद्राक्ष शिलवंत | |
८वी-१०वी | बालविकास | सिद्धांत भंडारे |
भारतीनिवास केंद्र | कोणी नाही | |
महेश बालभवन | कोणी नाही | |
ग. रा. पालकर | स्वराली उमराणी | |
अॅम्रो स्कूल | सुखदा इनामदार, काजल पारखे | |
नांदेड सिटी | राही बिरादर, प्रियांका सोनावणे | |
एल. बी.एस बालभवन | सार्थक गोंधणे | |
खुला गट | बालविकास | सोनम चोपडा, चारूलता ढोके, चारूलता ढोके, तुषार सागवेकर |
भारतीनिवास केंद्र | धृमिल सोवनी | |
महेश बालभवन | कोणी नाही | |
ग. रा. पालकर | अथर्व आगाशे, ओंकार पोकळे | |
अॅम्रो स्कूल | ऋतुजा गिरमे | |
नांदेड सिटी | ओजस्विता पोकळे, निकिता ठुबे, सुलभा फडणीस |
नाटय परिक्षा कशासाठी
बाल नाटय संस्कार:
१. ७ वर्षावरिल कोणालाही स्वत:चे नाव, पत्ता, शिक्षण, आवड कँमेरा समोर परिक्षेत सांगावे लागते. या परिक्षेमुळे हा सराव करताना स्पष्ट शब्दोच्चार, सभाधीटपणा वाढतो.
२ . कथाकथन, नाटय प्रवेश, नाटयछटा, एकपात्री स्वगत:
यामुळे स्मरणश्क्तीचा विकास होतो. एखादा संवाद,एखादी गोष्टवाचल्यावर / ऐकल्यावर पुन्हा ती सांगण्यासाठी स्मरणशक्ती, ती समर्थपणे सांगण्यासाठी आवाजातील बदल (वाचिक अभिनय), भावना व्यक्त करण्यासाठी आवाजाबरोबरच शरीराची होणारी हालचाल (आंगिक) अभिनय यांचा विकास होतो .
३ . अभिनय गीत:
संगीत हे मानवी मनाला आनंद देणारे, उत्साह वर्धक औषध आहे. अंगाई गीतापासुन त्याची सुरुवात होते. शब्दोच्चाराच्या प्रगतीसाठी बडबड गीतांची मदत घेतली जाते आणि बाल गीतांमुळे त्यांचे मनोरंजन तर होतेच पण सुर, लय व तालाची जाण येते शिवाय गीतातील भावनांमुळे सुर, लय, ताल याचा अभिनयाशी संबंध जोडला जातो .
४. सात स्वर सुरात म्हणणे:
शास्त्रीय संगीताची सुरुवात सरगमने म्हणजे सात स्वरांनी होते. ते सुरात म्हणणे म्हणजे संगीताबद्द्ल जाण निर्माण करणे होय. ही जाण त्याचे सांगीतीक जीवन समृध्द करतेच पण वाचिक अभिनयातील आवाजाच्या विविध छटा प्रकट करण्यास सहाय्यभुत होते.
५. नक्कल करणे:
माणुस भाषा शिकतो तोच मुळात नकलेतून. आई, वडिल, आजु बाजुची मंडळी यांच्या अनुकरणातुनच आपण भाषा शिकतो. पशु, पक्षी यांचे आवज, विविध फेरीवाले, त्यांच्या विकण्याच्या पध्द्ती, त्यांनी केलेल्या आवाजाचा वापर याचे निरिक्षण आणि अनुकरण यातुन वाणी संस्कार होत असतात.
नाटय परिक्षा कशी दयावी
सर्व कलांच्या परिक्षा आहेत पण नाटय विषयाची नाही. व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन नाटक आहे. तर सर्वांनी नाटय शास्त्र शिकले पहिजे आणि जगाचा रंगमंचावरिल आपली कोणतीही भुमिका प्रभावी केली पाहिजे. याच उद्देशाने नाटय प्रशिक्षणाचे काम करता करता नाटयपरिक्षा हा उत्तम उपाय सापडला आणि प्राथमिक नाटय शास्त्रावरचा अभ्यास करण्याकरीता अभ्यासक्रम ठरवला.
बाल नाटय संस्कार:
ही पहिली परिक्षा ७ वर्षावरील कोणालाही देता येते. किमान ७ वयोगट असल्याने या परिक्षेला लेखी पेपर नाही. ही परिक्षा कॅमेरा समोर घेतली जाते .
१. स्वत:च संपुर्ण नाव पत्ता सांगणे, शिक्षण शाळेचे नाव सांगणे आणि भरतमुनी कोण होते, त्यांनी काय लिहिले हे सांगता आले की त्यासाठी ५ पैकी गुण देण्यात येतात.
२ . कथाकथन (गोष्ट)/ नाटयछटा / नाटय प्रवेश यांपैकी कोणताही एक प्रकार साभिनय करुन दाखवायचा आहे . वाचिक,आंगिक अभिनय व विषय यांचा विचार करुन २०पैकी गुण दिले जातात .
३. अभिनय गीत: बालवाडी, शाळेपासुन अनेक बालगीते, बडबड गीते शिकवली जातात असे कोणतेही एक गीत किंवा कविता साभिनय सादर करायचे आहे. सुर, ताल, अभिनय या साठी १० पैकी गुण देण्यात येतात .
४. आरोह: अवरोह शास्त्रीय संगीतातील सरगम (सा,रे,ग,म,प,ध,नी,सां) सुरात म्हणता आले त्तर ५ पैकी गुण दिले जातात.
५. नक्कल: प्राणी, पक्षी, वादये यांच्या आवाजाची किंवा फेरिवाले, घरातील व्यक्तिंची किंवा टिव्हि मालीका – चित्रपटातील पात्रांची हुबेहूब नक्कल केल्यास ५ पैकी गुण दिले जातात .
६. एकुण परिणाम पाहुन ५ पैकी गुण दिले जातात. असे एकुण ५० पैकी गुण दिले जातात .
या परिक्षेचे प्रमाण पत्र समारंभ पूर्वक देण्यात येते.
असा हा पहिल्या परिक्षेचा सोप्पा अभ्यास क्रम आहे. दरवर्षी या परिक्षा घेतल्या जातात याबाबत अधिक महिती वेळोवेळी या वेबसाईट वर दिसेल.
नाटय परीक्षा
किशोर नाटयसंस्कार: ९ वर्षावरील कोणालाही मात्र बाल नाटय संस्कार परीक्षा दिलेल्यानां ही परीक्षा देता येते. यात लेखी आणि प्रात्यक्षिक अशी १०० गुणांची परीक्षा आहे.
लेखी परीक्षा: नाटयसंस्कार या पुस्तकातील कोणत्याही विषयावर प्रश्न येऊ शकतात . प्रश्नांचे स्वरूप जोडया लावा , गाळलेले शब्द भरा , योग्य शब्दांवर खुणा करा. यात ३० पैकी गुण दिले जातात. अशा प्रकारे कमीत कमी लेखकाचे प्रश्न असणार आहेत. यात ३० प्रश्नांची ३० गुणाची १/२ तासची परीक्षा असेल.
प्रात्यक्षिक परीक्षा: या परीक्षेला बसलेले विदयार्थ्यांचे ५ ते ८ विदयार्थांचे गट करण्यात येतील व त्यांनां एक विषय व त्या करिता १५ मिनीटे दिले जातील. त्यात त्यांनी ३ ते ५ मिनीटाचे नाटुकले सादर करावयाचे. यात ३० पैकी गुण दिले जातात. सादरीकरणातील त्याच्या अभिनयला ३० गुण देणात येतील यात याचा आंगिक व वाचिक अभिनय पाहिला जाईल.
मुलाखत: प्रत्येक विदयार्थ्याला स्वतंत्रपणे परीक्षक पुढील पाच विषयावर प्रश्न विचारतील .
{१} लेखक: दिलेल्या विषयावर तू कसे लेखन केले असतेस?
{२} दिग्दर्शन: हे नाटुकले तू दिग्दर्शन केले असते तर त्यात काय बदल केला असतास.
{३} नेपथ्य: या नाटकला काय नेपथ्य हवे होते ,या नाटकाला कोणती पार्श्वभूमी हवी होती ? व ती तू कशी उभी केली असतीस [रंगमंच दूष्यसेट डिझाइनींग]
{४} रंगभुषा व वेशभुषा: या नाटकातील पात्रांची वेशभुषा व रंगभुषा कशी हवी होती?
{५} पार्श्वसंगीत: या नाटीकेला पार्श्वसंगीताची आवश्यकता होती का ? असल्यास कोणत्या प्रकारचे संगीत हवे होते ? {करुण, आनंदी, रहस्यमय, भितीदायक ई.} प्रत्येक प्रश्नाला ५ गुण, अशी ३० गुणांची परीक्षा असेल. ऐकुण परिणामाला १० पैकी दिले जातील.
परिक्षेसाठी असलेल्या विषयांची यादी व अधिक माहिती वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होईल.
कुमारनाटय संस्कार: १२ वर्षावरील कोणलाही ही परिक्षा देता यईल. यात ३० गुणांची १/२ तासाची लेखी परिक्षा असेल. नाटय संस्कार पुस्तकातील अधिक सखोल प्रश्न यात विचारले जातील. प्रात्यक्षिक परिक्षेच्या स्वरुपात, रंगभुषा, वेशभुषा, रंगमंचाची प्रतीकृती तयार करणे, पार्श्वसंगीताचा वापर करणे इत्यादी गोष्टींचा समावेश असेल. अधिक माहिती या वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होईल .