दिवाकर स्मृती Online नाट्यछटा स्पर्धा २०२१

नाटय संस्कार कला अकादमी
आयोजित

दिवाकर स्मृती नाटयछटा स्पर्धा वर्ष 30 वे.

             Online जागतिक स्तरावर नाटयछटा स्पर्धा.

स्पर्धेचे नियम व अटी :- 

 • नाटयछटेचा विषय स्पर्धकांच्या वयोगटाला साजेसा हवा.
 • नाटयछटा म्हणजे कथाकथन ,एकपात्री नाटयप्रवेश किंवा स्वगत नाही. तो एक स्वतंत्र सादरीकरणाचा प्रकार आहे.
 • पाठांतर, स्पष्ट शब्दोच्चार ,सभाधीटपणा, वाचीक व आंगिक अभिनय याला गुण दिले जातील.
 • नाटयछटा सादर करताना रंगभूषा, वेशभूषा केली तरी चालेल पण त्याला स्वतंत्र गुण नाहीत.
 • स्पर्धकाच्या चेहर्यापासुन गुडघ्यापर्यंत चा भाग किमान दिसला पाहिजे. अन्यथा विडिओ ग्राह्य धरला जाणार नाही. 
 • नाटयछटा किमान वेळेपेक्षा कमी झाली किंवा कमाल वेळेपेक्षा जास्त झाली तर ती बाद होईल. ( १५ सेकंद कमी जास्त चालेल ) 
 • नाटयछटा सादर करताना प्रथम – गट क्रमांक, स्वत:चे संपुर्ण नाव (वडिलांच्या नावासहित), नाटयछटेचे नाव सांगायचे आहे आणि मग नाटयछटा सादर करायची आहे. 
 • नाटयछटेचा व्हिडिओ सलग चित्रित केलेला हवा , without edited ….( तुकडया तुकडयात करुन जोडलेले आढळल्यास ती स्पर्धेतुन बाद ठरविण्यात येईल )
 • स्पर्धकाने सोबत चा अर्ज व फी संस्थेच्या whatsapp नंबर वर पाठवावा.
 • अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची ऑनलाइन स्पर्धा घेतली जाईल.
 • प्राथमीक फेरीत सादर केलेली तीच नाट्यछटा पुन्हा अंतिम फेरीत सादर करायची आहे.
 • अंतिम फेरी ऑनलाइन लाइव्ह असल्यामुळे चांगल्या नेटवर्कची जबाबदारी स्पर्धकाची असेल.
 • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व तो स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

आजच प्रवेश घ्या :  Whatsapp वर मेसेज करा 🎭 8484930335
आणि त्यानंतर नाट्यछटेचा Video पाठवा.
शेवटची तारीख
🥳 22ऑगस्ट 🎭