संस्थापक

परिचय – (संक्षिप्त) नकलाकार, गुणवंत कामगार, संस्थापक व प्रमुख विश्वस्त नाट्य संस्कार कला अकादमी, बालनाट्य लेखक, दिगदर्शक, नाट्य विषयाच्या सर्व अंगावर व्याखाने, नाट्य माध्यमातून सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी धडपड , त्यासाठी पथनाट्य लेखक सादरीकरण व प्रशिक्षण , शालेय अभ्यासक्रम नाट्यरूपाने शिकवण्यासाठी अभयास नाट्याची चळवळ. महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम समितीवर सदस्य १ली ते ७वि कला विषयाच्या हस्तपुस्तिकेत नाट्यविषक उपक्रम.

पुरस्कार / सन्मान
 • गुणवंत कामगार पुरस्कार : महाराष्ट्र शासनाचा हा राज्य पुरस्कार हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लि., पिंपरी येथे कामगार म्हणून काम करताना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार १० मे १९८७ रोजी मुंबई येथे त्या वेळचे महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. शंकर दयाळ शर्मा यांचे हस्ते मिळाला. त्या निमित्ताने महानगरपालिका , केसरी मराठा संस्था इत्यादी संस्थांनीही गौरव केला.
 • १९८६ मध्ये भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे ‘ बाल रंगभूमी कार्य गौरव उदय सिंह पाटील ‘ पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • ‘सारस जेसी ‘ या संस्थेच्या वतीने दि. ११ सप्टेंबर १९८८ रोजी जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
 • ‘आर्टिस्ट ऑफ द इयर ‘ हा पुरस्कार सेंट्रल गव्हर्नमेंट कल्चरल कमिटी तर्फे टिळक स्मारक मंदिर पुणे येथे हस्ते जेष्ठ विनोदी अभिनेते श्री. देवेन वर्मा.
 • ५ जुलै १९९१ रोजी पुणे मराठी ग्रंथालयांकडून श्री. जयराम शिलेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 • १९९६ साली बाल रंगभूमीवरील कार्याचा गौरव म्हणून मा . बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते बालगंधर्व रंग मंदिरात सत्कार करण्यात आला.
 • नाट्य गौरव १९९८ हा पुरस्कार कला गौरव प्रतिष्ठान तर्फे बाल रंगभूमी कार्याबद्दल बालगंधर्व रंगमंदिर येथे सुप्रसिद्ध हिंदी नट व संवाद लेखक श्री. कादरखान यांच्या हस्ते मिळाला. उपस्थिति -मा . श्री. निळू फुले
 • १३ सप्टेंबर २००७ वंचित विकास निर्मळ रानवारा संस्थेतर्फे गौरव हस्ते माधवी वैद्य.
 • अखिल भारतीय नाट्य परिषद तर्फे बाल रंगभूमी कार्याचा गौरव १४ जून २००८ यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल दादर येथे, हस्ते मोहन वाघ उपस्थिती -मोहन जोशी,रमेश देव.
 • २००८ साली पर्वती पुण्यभूषण पुरस्कार हस्ते मा. रामचंद्र देखणे.
Recent Comments
  Archives
  Categories
  • No categories
  Open chat